राजापूर शहरात पुन्हा पुराचे पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:38+5:302021-07-15T04:22:38+5:30
- मुख्य चाैकाला पुराच्या पाण्याचा वेढा लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : पावसाची संततधार सुरूच असल्याने राजापूर तालुक्यातील अर्जुना व ...
- मुख्य चाैकाला पुराच्या पाण्याचा वेढा
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : पावसाची संततधार सुरूच असल्याने राजापूर तालुक्यातील अर्जुना व काेदवली नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी पुराचे पाणी राजापूर शहरात शिरले हाेते. शहरातील मुख्य चाैकाला पाण्याचा वेढा पडला हाेता.
गेले चार दिवस जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर तालुक्यातील नद्यांचे पाणी वाढले हाेते. चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर शहरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले हाेते. मात्र, साेमवारी रात्रीपासून पावसाचा जाेर काहीसा कमी झाल्याने मंगळवारी पुराचे पाणी ओसरले हाेते. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले हाेते. त्यातच मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जाेर पुन्हा वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे.
राजापूर तालुक्यातील अर्जुना व काेदवली नद्यांना पुन्हा पूर आला असून, पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चाैकापर्यंत आले आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. प्रशासनही सतर्क झाले असून, नागरिकांना व व्यापाऱ्यांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.