याेगेश कदम यांच्याकडून सिटी स्कॅन इमारत बांधकामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:29 AM2021-05-15T04:29:59+5:302021-05-15T04:29:59+5:30
खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनद्वारे रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी नवीन इमारत बांधण्याचे काम ...
खेड : तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनद्वारे रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू असून, आमदार योगेश कदम यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिपत्याखाली ही बांधण्यात येणार आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातच सिटी स्कॅन मशीनद्वारे रुग्णांना उपचार मिळणार असल्याने रुग्णांची चांगली सोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक
बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, अरुण कदम, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, करण चव्हाण, राकेश सागवेकर, युवती सेनेच्या शहर अधिकारी पूनम जाधव, रुग्णालय अधीक्षक डॉ.बाळासाहेब सगरे, डॉ. सावंत उपस्थित होते.
--------------------------------
khed-photo141
खेड येथील सिटी स्कॅन इमारत कामाची पाहणी आमदार योगेश कदम यांनी केली.