सामाजिक बांधिलकी जोपासणारे ‘क्लासमेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 07:20 PM2017-08-23T19:20:11+5:302017-08-23T19:20:11+5:30
वाटूळ : आजकालच्या गतिमान युगात क्लासमेट ही संकल्पना शाळा, कॉलेजपुरतीच मर्यादित राहिलेली दिसून येते. परंतु २००६ - ०७ साली आदर्श विद्यामंदिर, वाटूळ (ता. राजापूर) प्रशालेतून दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला ८०-८५ जणांचा क्लासमेट ग्रुप आपली सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांशी आपली नाळ जोडून आहे.

समाज माध्यमाद्वारे हे क्लासमेट अजूनही एकमेकांच्या संपर्कात राहून गावातील शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या गावच्या हितासाठी काही करता येईल का, याचा विचार करतात. त्यांनी शाळा वाटूळ नं. १, वाटूळ नं. ४ व विलवडे (ता. लांजा) येथील प्रतीक्षा मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन परिसरात वृक्षारोपण केले.
तसेच खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव उपक्रमही यशस्वी केला. आठवीपासून एकत्र असलेला हा क्लासमेट ग्रुप मुंबईमध्ये नोकरी वा व्यवसाय करत आपली उपजीविका करत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जोडलेले हे सर्व मित्र आठवड्यातून एकदा मुंबईतच एकत्र येतात. आपल्या शाळेच्या व गावच्या प्रगतीचा विचार करत आहेत.