अवघ्या अर्धा तासात मांडवी किनारा स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:37 AM2021-09-17T04:37:59+5:302021-09-17T04:37:59+5:30
रत्नागिरी : शहरातील मांडवी समुद्रकिनारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर किनाऱ्यावर निर्माल्य पडलेले हाेते. त्यामुळे किनारा अस्वच्छ झाला हाेता. ...
रत्नागिरी : शहरातील मांडवी समुद्रकिनारी पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर किनाऱ्यावर निर्माल्य पडलेले हाेते. त्यामुळे किनारा अस्वच्छ झाला हाेता. मात्र, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा पाेलीस दल, जिद्दी माऊंटेनिअरिंग आणि पाेलीस मित्रांनी एकत्र येत अवघ्या अर्ध्या तासात किनारा स्वच्छ केला.
नगर परिषद प्रशासनाकडून मांडवी येथे निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. त्यामध्येच सर्वजण निर्माल्य देत होते. परंतु, थाेड्या प्रमाणात निर्माल्य किनाऱ्यावर पडलेले हाेते. तसेच काही मूर्तीही किनाऱ्यावर आल्या हाेत्या. या मूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर काहीजण सामान तेथेच टाकून जातात. त्यामुळे निर्माल्य व अन्य साहित्यांमुळे किनारा अस्वच्छ झाला हाेता. हा किनारा स्वच्छ करण्याची मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यावेळी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सुनील शिवलकर, जिद्दी माऊंटेनिअरिंगचे धीरज पाटेकर उपस्थित होते. या माेहिमेमध्ये २ अधिकारी, १५ अंमलदार, ९ पोलीस मित्र, ४ मांडवी ग्रामस्थ आणि जिद्दी ग्रुपच्या ११ सदस्यांनी यात सहभाग घेतला हाेता.