बाजारपुलाचे काम बंद

By admin | Published: February 10, 2015 10:53 PM2015-02-10T22:53:24+5:302015-02-10T23:51:05+5:30

सुरेखा खेराडे : भोंगळ कारभाराला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा

Closing work on the market | बाजारपुलाचे काम बंद

बाजारपुलाचे काम बंद

Next

चिपळूण : येथील नगर परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरु असून सत्ताधारीही त्याला पाठीशी घालत आहेत. जुन्या बाजारपुलावरील पाईपलाईन बदलण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वीच हे काम सुरु करण्यात आले असून, नियमानुसार व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच ठेकेदाराने हे काम कसे काय सुरु केले, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी केला आहे. आता हे काम थांबवण्यात आले आहे.दि. १ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या नगर परिषदेच्या विशेष सभेत बाजारपुलावरील जुनी पाईपलाईन काढून ती बदलण्याबाबतच्या ३०० एमएम व्यासाची ९० मीटर पाईपलाईनसाठी ६ लाख २५ हजार २७८ रुपये व ३०० एमएम व्यासाची १५० मीटर पाईपलाईनसाठी १० लाख ३७ हजार ४०२ अशा दोन्ही मिळून १६ लाख ६२ हजार ६४० रुपयांच्या खर्चाला आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र, या विषयावर आवश्यक ती चर्चा सभागृहात आली नाही. मात्र, मिनिट बुकात मंजूर होऊन जाऊ दे पुढे अशी नोंद असल्याचे खेराडे यांनी सांगितले.
गोवळकोट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यादृष्टीने पाईपलाईन बदलणे जरी गरजेचे असले, तरी कौन्सिलच्या मंजुरीनंतर कामाची निविदा काढून ती मागवणे गरजेचे असताना, ती मागवण्यात आली नाही. काम करताना निविदेनुसारच ते करावे असा आग्रह सदस्य धरतात व त्यानंतर ठेकेदाराकडून कामाचे कायदेशीर करारपत्र करुन काम सुरु व्हावे लागते. ही कार्यपद्धती माहिती असताना, याबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पाईपलाईन हलवण्याच्या हालचाली झाल्या आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता व माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता नगर परिषदेच्या पत्र क्र.६२४ दि. १५ जानेवारी २०१५ नमूद केलेल्या पत्रातील मजकुरामध्ये पाईपलाईन बदलण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही, असे म्हटले आहे. हे काम घाईगडबडीत करण्या मागे काही तर गडबड (घोळ) आहे, असे निदर्शनास आल्यानंतर हे काम सध्या थांबवण्यात आले आहे.
शिमगोत्सव येणार असल्याने, देवी करंजेश्वरी या उत्सव या जुन्या पुलावरुन होत असल्याने, नागरिकांची ये-जा होत असते. हा पूल पुन्हा सुरु होणे गरजेचे असून नियमानुसार पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असते. मात्र, सध्या काम थांबवण्यात आले असल्याने, पुलाजवळच खड्डा खोदण्यात आल्याने, पाईपलाईन बदलण्याचे काम नियमानुसार केव्हा होईल, याचीही खात्री नसल्याने शिमगोत्सवात या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या कामकाजाबाबत शहरवासियांतून नाराजी व्यक्त होत आहे, असेही खेराडे सांगितले. (वार्ताहर)

निविदा प्रक्रियेपूर्वीच काम सुरू
चिपळूण पालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल सुरेखा खेराडे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. या प्रकरणातही त्यांनी निविदा काढण्याअगोदरच काम सुरू करण्यामागे कोणता हेतू असावा, असे विचारले आहे. खेराडे यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर, बाजारपुलावरील पाईपलाईन बदलण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली होती, ते काम थांबवण्यात आले.

Web Title: Closing work on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.