होवरपोर्ट निर्मितीमुळे कोकणचा समुद्रकिनारा अभेद्य-- तटरक्षक दलचे कमांडंट एस्. आर. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:02 AM2019-01-12T00:02:36+5:302019-01-12T00:11:53+5:30

रत्नागिरीमार्गे होवरक्राफ्टच्या अशा गस्ती सध्या वारंवार हाती घेण्यात येत आहेत. भाट्ये येथे होवरपोर्टची निर्मिती झाल्यानंतर कोकणचा समुद्रकिनारा अभेद्य होईल, असे तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडर

Coast Guard's Coast Guard inspires the construction of the Howverport - Commandant of the Coast Guard S. R. Patil | होवरपोर्ट निर्मितीमुळे कोकणचा समुद्रकिनारा अभेद्य-- तटरक्षक दलचे कमांडंट एस्. आर. पाटील

होवरपोर्ट निर्मितीमुळे कोकणचा समुद्रकिनारा अभेद्य-- तटरक्षक दलचे कमांडंट एस्. आर. पाटील

Next
ठळक मुद्दे- तटरक्षक दलाच्या होवरक्राफ्टची पाहणी - जिल्हाधिकारी यांच्याकडून सागरी सुरक्षेचा आढावा

रत्नागिरी : रत्नागिरीमार्गे होवरक्राफ्टच्या अशा गस्ती सध्या वारंवार हाती घेण्यात येत आहेत. भाट्ये येथे होवरपोर्टची निर्मिती झाल्यानंतर कोकणचा समुद्रकिनारा अभेद्य होईल, असे तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडर कमांडंट एस.आर. पाटील यांनी सांगितले.

तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस एच १९८’ हे होवरक्राफ्ट देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर गस्त घालत असताना गुरूवारी शहरातील भाट्ये बीचवर दाखल झाले. त्यानुषंगाने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  शुक्रवारी सकाळी या होवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला. 

येथील तटरक्षक दलाला रत्नागिरीत अद्ययावत होवरपोर्ट निर्माण करावयाचे आहे, त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे भाट्ये बीच येथे सुमारे ३ एकर जमीन तटरक्षक दलास हस्तांतरित केली आहे. रत्नागिरी हे देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई ते गोवा या दोन महत्वाच्या ठिकाणांच्या मध्यावरील केंद्र असल्याने यास सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे महत्व प्राप्त झाले आहे. नजिकाच्या काळात भाट्ये येथे होवरपोर्टचे काम पूर्ण होताच रत्नागिरी येथे तटरक्षक दलाचे तीन होवरक्राफ्ट सदैव तैनात असणार असून, अरबी समुद्रातून मार्गक्रमण करणाºया तटरक्षक दलाच्या इतर होवरक्राफ्टना देखील या होवरपोर्टवर पार्किंग, रसद पुरवठा किंवा तांत्रिक मदत आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

रत्नागिरीमार्गे मुंबई ते मंगलोरदरम्यान गस्ती घालणाºया या तटरक्षक दलाच्या होवरक्राफ्टची शुक्रवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमूगले आणि रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अरविन्द माळी यांनी पाहाणी केली. तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडर कमांडंट एस्. आर. पाटील यांनी होवरक्राफ्टची कार्यप्रणाली आणि प्रभावीपणा यांबद्दल माहिती करून दिले. 

Web Title: Coast Guard's Coast Guard inspires the construction of the Howverport - Commandant of the Coast Guard S. R. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.