राजन साळवी यांच्याकडून किनारपट्टीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:52+5:302021-05-18T04:32:52+5:30
राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्यातील किनारपट्टी भागात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ या नुकसानाची आमदार राजन साळवी यांनी ...
राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्यातील किनारपट्टी भागात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ या नुकसानाची आमदार राजन साळवी यांनी जिल्हा परिषद सदस्य व सरपंचांसह पाहणी केली़
तालुक्यातील किनारपट्टीवर वादळ येण्याची शक्यता असल्यामुळे आमदार राजन साळवी रात्रभर किनारपट्टीवरील जिल्हा परिषद सदस्य व सरपंच यांच्या संपर्कात होते. सकाळी ६ वाजल्यापासून आढावा घेण्यासाठी स्वतः किनाऱ्यावर भेट देण्यासाठी उतरले हाेते़ रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने प्रशासनाने सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच साधनसामग्री तयार ठेवावी प्रशासनास आदेश होते़ त्यांच्या कर्तव्य दक्षतेपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांच्यासह कशेळी व वाडा पेठ आणि वेत्ये किनारपट्टीलगत घरांना भेट दिली़ यावेळी अथर्व साळवी, कशेळी सरपंच सोनाली मेस्त्री, माजी सरपंच प्रकाश दुकले, सरपंच नंदिनी जाधव, सुनील रूमडे, राजू जाधव, तलाठी गायकवाड, ग्रामसेवक लांजेकर, सुनील जाधव, रोहन पावसकर, नंदू फोडकर, नंदा पवार, ग्रामसेवक पिठलेकर उपस्थित होते.
-------------------
राजापूर तालुक्यातील वेत्ये भागाला आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन पाहणी केली़ यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते़