गुहागर तालुक्यात सर्दी, तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:28+5:302021-04-18T04:30:28+5:30
असगोली : एकीकडे काेराेनाचे रुग्ण वाढत असतानाच गुहागर तालुक्यात सर्दी, तापाची साथ वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...
असगोली : एकीकडे काेराेनाचे रुग्ण वाढत असतानाच गुहागर तालुक्यात सर्दी, तापाची साथ वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.
तालुक्यातील मढाळ गावातील चव्हाणवाडीमध्ये सध्या ताप व सर्दीची साथ जोरात आहे. या भागात अद्याप आराेग्य विभागाची यंत्रणा पाेहाेचली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये या साथीचा फैलाव होत असून, नक्की सर्दी, ताप आहे की कोरोनाची लक्षणे याबाबत संभ्रमावस्था झाली आहे.
तालुक्यामध्ये सर्दी, तापाची साथ आली असली व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी आम्ही आमचे कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देऊन सर्दी, तापाची साथ कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील जनतेने घाबरून जाऊ नये व सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी देवीदास चरके यांनी केले आहे.