जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांची केली विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 06:37 PM2021-04-23T18:37:37+5:302021-04-23T18:40:24+5:30

CoronaVirus Ratnagiri : तुम्हाला योग्य उपचार मिळतात का? तुमच्याकडे लक्ष दिले जात का? तुम्हाला मिळणारे जेवण चांगले आहे ना? अशा शब्दात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली.

- The Collector questioned the Corona patients | जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांची केली विचारपूस

जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांची केली विचारपूस

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांची केली विचारपूसयोग्य उपचार, जेवण मिळत आहे ना?

रत्नागिरी : तुम्हाला योग्य उपचार मिळतात का? तुमच्याकडे लक्ष दिले जात का? तुम्हाला मिळणारे जेवण चांगले आहे ना? अशा शब्दात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली.

शहरानजीकच्या कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनमधील कोरोना केअर सेंटर, रा. भा. शिर्के प्रशाला येथील स्क्रिनिंग सेंटर, माळनाका व रेल्वे स्टेशन येथील तपासणी पथकाला गुरुवारी भेट दिली. सामाजिक न्याय भवनमधील रुग्णांशी थेट संपर्क साधून मिळणारे औषधोपचार व जेवण याविषयी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड याही उपस्थित होत्या. कोविड केअर सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, पुरेसा औषध साठा व शासनाच्या मार्गदर्शक प्रोटोकॉलनुसार देण्यात येणारे उपचार याविषयी डॉक्टर व स्टाफशी चर्चा करून मार्गदर्शन केले. तेथील डॉक्टर, स्टाफ नर्स व वॉर्डबॉय यांच्या कामांबाबत जिल्हाधिकारी मिश्रा यांनी समाधान व्यक्त केले. डॉक्टर व स्टाफ नर्स खूप चांगले काम करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे या दोन्ही अधिकाऱ्यांनी रा. भा. शिर्के प्रशालेतील स्क्रिनिंग सेंटर व रेल्वे स्टेशन येथील तपासणी पथकाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यरत असलेल्या कोविड योद्ध्यांना मी जबाबदार कोरोना योद्धा असे स्लोगनवाल्या टी-शर्टचे वाटप केले.

सामाजिक न्याय भवनात एकूण ६९ सक्रिय रुग्ण आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये योगाचे क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते.

सक्रिय अधिकारी

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड हे दोन्ही प्रमुख अधिकारी सातत्याने कार्यरत आहेत. कोविड सेंटर्समधील वाढीव सुविधांबाबत आवश्यक ती दक्षताही घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना चांगले पाठबळ मिळत आहे.
 

Web Title: - The Collector questioned the Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.