हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे ठरले...जेवणासाठी आले अन् पाण्याने गिळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 01:57 PM2019-07-05T13:57:24+5:302019-07-05T14:00:22+5:30
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग मित्रदेखील धरणाच्या पाण्याबरोबर वाहून गेले. या जीवलग मित्रांच्या आठवणीने आजही त्यांच्या सगे सोयºयांच्या डोळ्यात अश्रूचे बांध उभे राहतात.
सुनील पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही राहणार पोफळी) आणि सुमित निकम (रा. कोंडफणसवणे) अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांच्या मैत्रीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
तिवरे येथे मंगळवारी रात्री धरण फुटलं आणि हाहाकार माजला. या दुर्घटनेत अनेकांवर काळाने घाला घातला. काळाच्या या जबड्यातून पोफळी आणि कोंडफणसवणेतील चार जीवलग मित्र सुद्धा सुटले नाहीत. तिवरेगावातील मित्राकडे जेवणाच्या निमित्ताने हे तिथं गेले आणि या धरणाच्या पाण्यात या सर्वांना काळाच्यापडद्या आड नेलं. नियती एखाद्याला आपल्या कवेत कसं घेते याचं हे उदाहरण...
तिवरे आणि पोफळी हे अंतर केवळ ३० किलोमीटरचेच आहे. सुनील पवार याचा मित्र चव्हाण याच्या तिवरे इथल्या घरी जेवणाचा बेत आखण्यात आला होता. त्यानिमित्ताने सुनील पवार, रंजित, राकेश आणि सुमित हे चौघे या तिवरे धरणाला लागून असलेल्या घरी गेले होते. जेवणाच्या निमित्ताने सारे मित्र एकत्र येणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर होता. पण हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे जेवण ठरले.