भाविका झोरेच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आयुक्तांचे चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:11 PM2021-02-13T16:11:11+5:302021-02-13T16:12:56+5:30

Crimenews Police Ratnagiri- देवरुख तालुक्यातील नायरी येथील भाविका झोरे हिच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन कैफियत मांडली. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी कोथरुड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

Commissioner of Police orders inquiry into Bhavika Zore's death | भाविका झोरेच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आयुक्तांचे चौकशीचे आदेश

भाविका झोरेच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आयुक्तांचे चौकशीचे आदेश

Next
ठळक मुद्देभाविका झोरेच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आयुक्तांचे चौकशीचे आदेश सासरच्या मंडळींकडून छळ, संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांनी मांडली कैफियत

देवरुख : तालुक्यातील नायरी येथील भाविका झोरे हिच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन कैफियत मांडली. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी कोथरुड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुणे येथे भाविका झोरे हिचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता. त्यातच तिचा ३ फेब्रुवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या गुन्ह्यात तपास योग्य दिशेने होत नसल्याने भाविकाच्या नातेवाईकांनी ९ फेब्रुवारी रोजी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन व्यथा मांडली.

या गुन्ह्यात तपास अधिकारी असलेल्या पोलिसांकडून नातेवाईकांना वाईट वागणूक दिल्याची लेखी तक्रारही करण्यात आली आहे. भाविकाच्या मृत्यूचा गुन्हा दाखल करून घेण्यास ४ फेब्रुवारीची सायंकाळ झाल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच ४ फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल करायला गेलेल्या नातेवाईकांना सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १० तास कोथरुड पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागल्याचेही आयुक्तांना सांगण्यात आले. या प्रकरणी तपास योग्य दिशेने होण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशीही पत्रव्यवहार केला होता.

Web Title: Commissioner of Police orders inquiry into Bhavika Zore's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.