मंडणगडातील रस्ते भ्रष्टाचाराची समितीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 06:20 PM2020-11-09T18:20:11+5:302020-11-09T18:22:33+5:30

रस्ता भ्रष्टाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने शनिवारी मंडणगड आंबडवे घोसाळे पंदेरी पेवे म्हाप्रळ या मार्गाची पाहणी केली. या समितीच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Committee inspects road corruption in Mandangad | मंडणगडातील रस्ते भ्रष्टाचाराची समितीकडून पाहणी

मंडणगडातील रस्ते भ्रष्टाचाराची समितीकडून पाहणी

Next
ठळक मुद्देमंडणगडातील रस्ते भ्रष्टाचाराची समितीकडून पाहणी समितीच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष

मंडणगड : रस्ता भ्रष्टाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने शनिवारी मंडणगड आंबडवे घोसाळे पंदेरी पेवे म्हाप्रळ या मार्गाची पाहणी केली. या समितीच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे मंडणगडचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंडणगड कार्यालयाकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. त्या अनुषंगाने ही समिती नेमण्यात आली आहे. रस्ते देखभाल व दुरुस्तीचे कामात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार करत घोसाळकर यांनी स्वातंत्र्यदिनी भिंगळोली येथील तहसील कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. यावेळी तहसीलदारांनी आक्षेपार्ह कामांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर तहसील कार्यालयाने नेमलेल्या समितीने या कामांची पाहणी करुन अहवाल दिला होता. मात्र, हा अहवाल सार्वजनिक न झाल्याने भ्रष्टाचार झाला आहे अथवा नाही, याचा उलगडा झालेला नव्हता. याशिवाय बांधकाम खात्याशी संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांनी हा अहवाल तयार केलेला असल्याने या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला कायद्याने बंधनकारक नव्हते. त्यामुळे हा अहवाल बासनात गुंडाळला गेला. तक्रारदाराने वेळोवेळी जाहीर नाराजी व्यक्त केली व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.

अखेर चौकशी समिती नेमली गेली व या समितीने संतोष घोसाळकर व स्थानिक अधिकाऱ्यांसह तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने स्थळांची पाहणीही केली. या चौकशी समितीत चिपळूण सा. बां. विभागाचे उपअभियंता नलावडे, तक्रारदार संतोष घोसाळकर, मंडणगड बांधकाम उपविभागाचे उपअभियंता माधव कोंडविलकर, अभियंता निनाद दामले, ठेकेदार मल्लू राठोड, राहुल गोपाळ हे सहभागी होते.

मांजराला उंदराची साक्ष : घोसाळकर
संतोष घोसाळकर यांनी अपहाराची तक्रार करताना स्थानिक अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. मात्र चौकशी समितीने नेमताना ज्या अधिकाऱ्यावर आरोप झाले आहेत त्याच श्रेणीतील अधिकारी समितीचा प्रमुख केला आहे. हा प्रकार मांजराला उंदराची साक्ष असल्यासारखा असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Committee inspects road corruption in Mandangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.