समाजाने एकत्र यावे!

By admin | Published: June 17, 2016 10:12 PM2016-06-17T22:12:52+5:302016-06-17T23:34:14+5:30

दादा इदाते : जिल्हा गोरबंजारा विकास संघटनेच्यावतीने खेड येथे मेळावा

Community should come together! | समाजाने एकत्र यावे!

समाजाने एकत्र यावे!

Next

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील गोरबंजारा समाजाने आपले विविध प्रश्न व मुलभूत समस्या मार्गी लावण्यासाठी एकत्रित येणे आवश्यक असून, याकरिता समाजातील सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन भटक्या व विमुक्त जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा इदाते यांनी खेड येथील कार्यक्रमामध्ये केले.
रत्नागिरी जिल्हा गोरबंजारा विकास संघटनेच्यावतीने खेड येथे आयोजित जिल्हा मेळाव्यात दादा इदाते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते़ यावेळी जिल्हाध्यक्ष मल्लूशेठ राठोड, उपाध्यक्ष सुनील नाईक, भटक्या जाती-जमाती आयोग मध्यप्रदेशचे सदस्य श्रवणसिंग राठोड, खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, मुंबई गोरबंजारा संघर्ष समितीचे संयोजक रविराज राठोड, पोहरागडचे संदेश चव्हाण, रत्नागिरीचे पंडित राठोड, गीता राठोड, ठाणे येथील जनाबाई राठोड, सुनिता राठोड, धुळे येथील सुजाता राठोड, खेड येथील बंजारा समाजाच्या अभ्यासक प्रियांका राठोड, रवींद्र चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते़
यावेळी दादा इदाते यांनी सांगितले की, देशातील २३ राज्यांमधील भटक्या व विमुक्त समाजातील विविध प्रश्नांचा आपण अभ्यास केला असून, या राज्यांतील विविध प्रश्न व समस्या या वेगवेगळया असल्याचे सांगत इदाते यांनी हे सर्व प्रश्न आणि समस्या एकत्रित करून या आयोगाचा अध्यक्ष म्हणून ते मार्गी लावण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले़ त्यासाठी मला तुमची साथ हवी असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रांताधिकारी फड यांनी मार्गदर्शन केले़
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद राठोड यांनी केले तर आभार चंद्रकांत राठोड यांनी मानले़ यावेळी बहुसंख्येने गोरबंजारा समाजातील बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मतांसाठी वापर : हक्कासाठी लढा
वारंवार येणाऱ्या निवडणुकांमध्ये गोरबंजारा समाजाचा केवळ मतांसाठीच वापर करण्यात आला. त्यामुळे आता सर्वांनी आपल्या न्याय हक्कांसाठी लढा, असे सांगितले.

Web Title: Community should come together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.