प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - उदय सामंत

By अरुण आडिवरेकर | Published: February 4, 2024 02:56 PM2024-02-04T14:56:00+5:302024-02-04T14:56:58+5:30

रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या प्राणी संग्रहालयाबाबत पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आढावा बैठक घेतली.

Complete Zoological Museum work by 15th August - Uday Samant | प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - उदय सामंत

प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - उदय सामंत

रत्नागिरी : प्राणी संग्रहालयाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, अशा पध्दतीने संबंधित विभागांनी कामकाज करावे, अशी सूचना रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली. 

रत्नागिरीत उभारण्यात येणाऱ्या प्राणी संग्रहालयाबाबत पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे आढावा बैठक घेतली. बैठकीला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ‍विपीन शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपवन संरक्षक दीपक खाडे उपस्थित होते. 

मंत्री सामंत यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्यामध्ये एमआयडीसीचे अधिकारी, प्रांत, पोलिस उपअधीक्षक, गटविकास अधिकारी, वन खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन अशासकीय सदस्य यांचा समावेश करावा. वन विभागाने कात्रज, जयपूर, नागपूर येथील संग्रहालयांशी समन्वय साधावा. हे प्राणी संग्रहालय सर्वोत्तम करु. याठिकाणी फुड पार्क, सोव्हीनियर शॉप सुविधा देऊ. यासाठी सिंधुरत्नमधून निधी दिला जाईल. आवश्यक पडल्यास एमआयडीसीमधून निधी देऊ, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Complete Zoological Museum work by 15th August - Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.