राज्य परिवहन महामंडळातर्फे आता शहरी बस वाहतुकीतही सवलत, रत्नागिरीत उद्यापासून अंमलबजावणी
By मेहरून नाकाडे | Published: June 22, 2024 04:52 PM2024-06-22T16:52:00+5:302024-06-22T16:53:36+5:30
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत योजना आता शहरी बस वाहतूकीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत योजना आता शहरी बस वाहतूकीला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रविवार दि. २३ जून पासून या सवलत योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे महिलांसाठी महिला सन्मान योजनेतंर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत, ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत तर ७५ वर्षापुढील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात १०० टक्के सवलत योजना राबविण्यात येत आहे. शहरी वगळता राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेससाठी ही सुविधा उपलब्ध होती.
मात्र शहरी बसेस या सवलत योजनेपासून वंचित असल्याने प्रवाशांकडून या योजना राबविण्याची मागणी जोर धरून होती. प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी विभागांतर्गत सुरू असलेल्या शहरी बसेससाठी सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार दि. २३ जून पासूनच या सवलत योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.