कृषी अर्थशास्त्राच्या आंतराष्ट्रीय परिषदेचा समारोप
By admin | Published: February 20, 2016 12:00 AM2016-02-20T00:00:03+5:302016-02-20T00:45:27+5:30
दापोली तालुका : विविध पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण; हिरोजी उलेमालेंना ‘जीवन गौरव’
दापोली : कृषी विद्यापीठाच्या डॉ. स्वामीनाथन सभागृहात कृषी अर्थशास्त्रविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.व्यासपीठावर विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. रमेश बुरटे, महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे, परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष तथा कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जीवन तलाठी, आयोजन सचिव डॉ. सुधीर वाडकर, डॉ. राजेंद्र देशमुख व डॉ. एस. सी. नागपुरे उपस्थित होते.यावेळी परिषदेतील विविध विषयांवर शोधनिबंध, पोस्टर सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांना तसेच विविध समित्यांच्या प्रतिनिधींना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रा. हिरोजी उलेमाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार डॉ. शामराव जहाँगीरदार यांना, स्व. प्रा. वेणुताई उलेमाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विद्यार्थ्यांसाठी असलेला पुरस्कार एस. टी. गोरे यांना, स्व. वामनराव महिंंदे्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ परिषदेत सर्वोत्कृष्ट शोधनिबंध सदर करण्यासाठी असलेला चांदीचा चषक डॉ. ए. एस. टिंगरे यांना, स्व. पार्वतीबाई महिंंद्रे स्मृतिप्रित्यर्थ सर्वोत्कृष्ट महिला कृषी अर्थशास्त्र पुरस्कार डॉ. रचना पाटील यांना, डॉ. व्ही. डी. गलगलीकर हा पुरूषवर्गातील सर्वोत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्याला दिला जाणारा पुरस्कार डॉ. डी. एस. नावडकर यांना, स्व. डी. के. सोहनी स्मृतिप्रित्यर्थ पुस्तक प्रकाशनासाठीचे चांदीचे पदक डॉ. ए. सी. देवरूखकर यांना, स्व. ज्योती सुरेश मारावार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अन्य शाखेतील महिलांमधून सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी दिला जाणारा पुरस्कार स्वप्ना मोरे यांना, स्व. डॉ. जगन्नाथ रामचंद्र काकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कृषी अर्थशास्त्र शाखेतील महिलांमधून सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी दिला जाणारा डॉ. एस. जे. काकडे पुरस्कार तेजश्री निर्मोल यांना, स्व. वामनराव रामराव जहाँगीरदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कृषी अर्थशास्त्र शाखेतील पुरूषांमधून सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी दिला जाणारा डॉ. एस. डब्ल्यू. जहाँगीरदार पुरस्कार पी. एस. देशमुख यांना, स्व. वेणूताई उलेमाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सन २०१५मध्ये शेतकऱ्यांसाठी फायदेशीर लेख लिहिणाऱ्यास असलेले प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह डॉ. डी. डी. यादव यांना. स्व. वेणुताई उलेमाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरूषांमधून सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठीचे रोख पारितोषिक व्ही. ओ. बोंद्रे यांना, तर स्व. राहुल सुरवसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पोस्टर सादरीकरणासाठी असलेले प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह सूरजकुमार राऊत व भरतेश कुपानहट्टे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल डॉ. एस. एस. वाडकर यांना कृतज्ञता प्रमाणपत्र व चांदीचे पदक देऊन डॉ. प्रकाश महिंद्रे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ. एस. एस. वाडकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नितीन गोखले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जीवन तलाठी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठामध्ये दोन दिवसीय कृषी अर्थशास्त्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध विषयांवर उहापोह झाला.
कृषी अर्थशास्त्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. त्यामुळे या परिषदेला अधिक महत्व प्राप्त झाले होते.
कृषी अर्थशास्त्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा यावर्षीचा मान दापोली कोकण कृषी विद्यापीठाला मिळाला होता. या परिषदेचे उद्घाटन दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.