श्री भैरी बुवांच्या शिमगोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:14+5:302021-04-03T04:28:14+5:30

तन्मय दाते फोल्डरला फोटो सेव्ह आहे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी ...

Conclusion of Shri Bhairi Buwa's Shimgotsava | श्री भैरी बुवांच्या शिमगोत्सवाची सांगता

श्री भैरी बुवांच्या शिमगोत्सवाची सांगता

Next

तन्मय दाते फोल्डरला फोटो सेव्ह आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव रविवारपासून सुरू होता. मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाल्यानंतर धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आल्यानंतर शिमगा उत्सवाची सांगता झाली.

शुक्रवारी श्री देव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी झाडगांव सहाणेवरून उठली. त्यानंतर शहरात सर्वत्र रंगपंचमीला प्रारंभ झाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी शस्त्रसलामी दिल्यानंतर पालखी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून झाडगांव नाक्यावरून गाडीतळ येथे आली. पुढे श्री नवलाई पावणाई मंदिरातून शहर पोलीस स्थानक, तेथून धनजीनाका, राधाकृष्ण नाका, रामनाका, मारुती आळी, गोखलेनाका, ढमालनीचा पार, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर खालची आळीमार्गे मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाली. त्यानंतर मंदिरात धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आले. शिवाय कोरोनाचा समूळ नाश करून समस्त जनतेच्या रक्षणाचे साकडे भैरीबुवांना घालण्यात आले.

बारा वाड्यांचे ग्रामदैवत असणाऱ्या भैरी बुवाचा शिमगोत्सव शासकीय निर्बंधात साजरा करण्यात आला. गर्दी टाळून शांततेत व साधेपणाने गेले चा-पाच दिवस सुरू असलेल्या शिमगा उत्सवाची शुक्रवारी रात्री सांगता झाली.

काही गावांतील पालख्या गुढीपाडव्यापर्यंत असल्याने गावा-गावातूनही शांततेत शिमगोत्सव साजरा केला जात आहे. गर्दी टाळण्यासाठी पालखी भेट सोहळा, यात्रा व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले असून धार्मिक कार्यक्रम मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहेत.

Web Title: Conclusion of Shri Bhairi Buwa's Shimgotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.