स्टेट बँकेच्या एटीएमची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:26+5:302021-05-15T04:30:26+5:30
संगमेश्वर : येथील बाजारपेठेतील आणि महामार्गालगतची भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमची सध्या दुरवस्था झाली आहे. एटीएम केबिनचा दरवाजा तुटल्याने एटीएमची ...
संगमेश्वर : येथील बाजारपेठेतील आणि महामार्गालगतची भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमची सध्या दुरवस्था झाली आहे. एटीएम केबिनचा दरवाजा तुटल्याने एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे या दरवाजाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
कर्मचाऱ्यांना जादा वेतन द्यावे
रत्नागिरी : काेरोनासारख्या कठीण काळात ग्रामपंचायत कर्मचारी अल्प वेतनावर काम करत आहेत. या काळात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना संपेपर्यंत प्रतिमहा एक हजार रुपये जादा वेतन मिळावे, अशी मागणी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे केल्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव कृष्णा होडे यांनी दिली.
प्रभागनिहाय लसीकरण करावे
चिपळूण : शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहिमेत पुरता गोंधळ उडाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लस घेण्यासाठी नागरिकांना पहाटेपासून त्रास सहन करावा लागत आहे. याबरोबरच लसीकरण केंद्र मर्यादित असल्याने तेथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. शासनाने हे लसीकरण ग्रामपंचायत स्तरावर तसेच नगरपालिका हद्दीत प्रत्येक प्रभागात सुरू करावे, अशी मागणी मिरजोळी येथील रहिमान दलवाई यांनी केली आहे.