विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची विशेष मोहीम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:37 AM2021-09-04T04:37:48+5:302021-09-04T04:37:48+5:30
देवरुख : शाळा-महाविद्यालय येत्या काही महिन्यात सुरू होतील, हे गृहीत धरून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची विशेष मोहीम प्राधान्याने राबवावी, अशी मागणी ...
देवरुख : शाळा-महाविद्यालय येत्या काही महिन्यात सुरू होतील, हे गृहीत धरून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची विशेष मोहीम प्राधान्याने राबवावी, अशी मागणी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.इंदुराणी जाखड यांना निवेदन देण्यात आले आहे.
शासनाने आता शाळा महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान शाळा, महाविद्यालय सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर यापूर्वी विद्यार्थ्यांना कोरोनावर मात करायला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे असल्याने, प्रशासनाने खास बाब म्हणून ही मोहीम राबविली, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष सदानंद भागवत, उपाध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, श्रीराम भावे, नाना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. शाळा, महाविद्यालयात लसीकरण केंद्र मिळावे, तसेच त्या-त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन प्रकर्षाने लसीकरणाची मोहीम राबविणे गरजेचे बनले आहे.
020921\22502011-img-20210902-wa0042.jpg
सीईओ यांना निवेदन देताना सदानंद भागवत, अभिजीत हेगशेट्ये