प्रभाग संख्या वाढल्याने संभ्रम

By admin | Published: November 2, 2016 11:06 PM2016-11-02T23:06:36+5:302016-11-02T23:06:36+5:30

खेड नगर पालिका : उमेदवारांना मतदारांमध्ये करावी लागणार जागृती

Confusion due to increasing number of wards | प्रभाग संख्या वाढल्याने संभ्रम

प्रभाग संख्या वाढल्याने संभ्रम

Next

श्रीकांत चाळके ल्ल खेड
खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागनिहाय मतदारांमध्ये मोठे बदल झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत शहरातील प्रभागांमध्ये मोठे बदल झाल्याने प्रत्येक पक्षातील उमेदवाराला आणि कार्यकर्त्याला मतदारांमध्ये जनजागृती करावी लागणार आहे. प्रभागातील उमेदवारही बदलल्याने नव्या उमेदवारांची मतदारांची समजूत काढताना चांगलीच दमछाक होणार आहे. पूर्वीच्या तुलनेत प्रत्येक प्रभागातील मतदारांमध्ये आता वाढ झाल्याने आणि उमेदवारांची संख्या देखील वाढल्याने आपला उमेदवार कोण तसेच आपण कोणाच्या पाठीशी राहायचे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सन २०११मध्ये एकूण १७ सदस्य ४ प्रभागातून निवडले जात होते. प्रभागसंख्या कमी असली तरी नगरसेवक तेवढेच निवडून जात होते. त्यावेळी प्रभाग क्र. १मध्ये पुरुष मतदार १२५३ व स्त्री मतदार १२४६ मिळून २४९९ मतदार होते. गतवर्षी ८२५ पुरुष व ९४३ स्त्री मतदार मिळून १७६८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. सरासरी ७० टक्के मतदान झाले होते. याप्रमाणे प्रभाग २मध्ये १३९८ पुरुष व १४७० स्त्री मतदार मिळून २८६८ मतदार होते. यातील ९१४ पुरुष व ९८४ महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.
सरासरी मतदान ६६ टक्के झाले होते. प्रभाग ३मध्ये ११४२ पुरुष व ११९६ स्त्री मतदार मिळून २३३८ मतदार होते. यातील ८१९ पुरुष व ८८४स्त्री मतदारांनी मतदान केले होते. सरासरी ७२ टक्के मतदान झाले होते, तर प्रभाग ४मध्ये १४५४ पुरुष व १५०६ स्त्री मतदार मिळून २९६० मतदार होते. यातील ९६८ पुरुष व ११४७ स्त्री मतदार मिळून २०८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी सरासरी ७० टक्के मतदान झाले होते.
सन २०११च्या जनगणनेनुसार या प्रभागाच्या संख्येत बदल झाला नव्हता. मात्र, आता या प्रभाग रचनेत ंआणि मतदारसंख्येत बदल झाला आहे. सन २०११मध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये वैशाली कवळे निवडून आल्या होत्या. त्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यावेळच्या निवडणूक प्रक्रियेमुळे आता प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, असे संकेत मिळत होते. मात्र, त्यानंतर थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झालीच नाही. २०११मध्ये शहरातील प्रभाग संख्याही ४ होती. त्यावेळीही मतदारांच्या संख्येत फारसा बदल झाला नव्हता. तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक कुटुंबांनी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे, यासाठी शहरात भाड्याने घर घेऊन राहाणे अथवा फ्लॅट वा घर खरेदी करुन राहाणे पसंत केले होते. आजही ग्रामीण भागातून हे स्थलांतर सुरुच आहे. मात्र, मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तसेच नोकरीतील बदली किंवा निवृत्त झाल्यानंतर शहरातील भाड्याने घेतलेली घरे सोडून अथवा खरेदी केलेली घरे अन्य लोकांना विकून पुन्हा ग्रामीण भागात जाणे हे लोक पसंत करतात. अशा विविध कारणांमुळे शहरातील प्रभागातील मतदारसंख्या कमी - जास्त होत असते. याचाच मोठा परिणाम निवडणुकीतील मतदानावर होत आहे. मात्र, २००१, २००५, २०११मधील सार्वत्रिक निवडणुकीतील मतदारसंख्येमध्ये फारसा मोठा फरक नसल्याचे दिसून येत आहे. सन २०११मधील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जेवढे मतदार होते त्यापेक्षा १०० मतदार २०१६मध्ये वाढले आहेत. ५ वर्षात केवळ १०० मतदारांची भर पडल्याने २०१६च्या नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना मिळणाऱ्या मतदारसंख्येत फारसा फरक पडणार नसल्याचेच या आकडेवाडीवरुन दिसून येत आहे. पूर्वीच्या ४ प्रभागामध्ये असलेले १०७६५ मतदार आता नव्याने झालेल्या ४ऐवजी ८ प्रभागामध्ये विभागले आहेत.
छाननी प्रक्रिया बुधवारी झाल्याने उमेदवारांनी मतदारांची भेट घेतलेली नाही. आवश्यकता भासल्यास जाणीव जागृती अभियानासारखी कामे यावेळी उमेदवारांना करावी लागणार आहेत. मतदारांमध्ये सद्यस्थितीत निर्माण झालेला संभ्रम या निमित्ताने दूर होण्यास मदत होणार आहे.
पूर्वी होती प्रभाग संख्या कमी; मतदार जास्त
खेड शहराची लोकसंख्या २०११ म्च्या जनगणननुसार १६ हजार ८९७ आहे. त्यावेळी खेड शहरातील एकूण प्रभाग संख्या ४ होती. या प्रभागांची संख्या कमी असल्याने मतदारांची संख्या मात्र मोठी होती. प्रभाग क्र. १ ते ३ मध्ये यावेळी ४ सदस्य तर प्रभाग क्र.४ मध्ये ५ सदस्य होते. नगरपालिकेवर निवडून जात असत.
मतदार उमेदवारांपासून झाले विभक्त
प्रभागांची संख्या वाढल्याने पूर्वीच्या प्रभागातील सर्वच मतदार जुन्या उमेदवारांपासून विभक्त झाले आहेत तर प्रभागनिहाय आरक्षणात मोठे बदल झाल्याने काही उमेदवारांची आयात करण्यात आली आहे त्यामुळे आताच्या पालिका निवडणुकीत नवे उमेदवारांना आपली पार्श्वभूमी तेथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन नव्याने सांगावी लागणार आहे.
 

Web Title: Confusion due to increasing number of wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.