चिपळुणात कृषी व कामगार विधेयकाविरोधात काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:33 AM2021-03-27T04:33:19+5:302021-03-27T04:33:19+5:30
केंद्र सरकारच्या कृषी व कामगार विधेयकांविराेधात शुक्रवारी चिपळूण येथे काँग्रेसतर्फे उपाेषण करण्यात आले. (छाया : संदीप बांद्रे) लाेकमत न्यूज ...
केंद्र सरकारच्या कृषी व कामगार विधेयकांविराेधात शुक्रवारी चिपळूण येथे काँग्रेसतर्फे उपाेषण करण्यात आले. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : केंद्र सरकारने केलेल्या जाचक कृषी व कामगारविरोधी कायद्याविरोधात काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उपोषण छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. उपाेषणादरम्यान रत्नागिरी जिल्हा काँग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली.
शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीत आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला बराच काळ होऊन गेला तरी केंद्र सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. यामुळे केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी काँग्रेसतर्फे उपोषण छेडण्यात आले हाेते. या पार्श्वभूमीवर चिपळूण कॉँग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम यांच्या महामार्गालगत शिवसागर हॉटेल शेजारील कार्यालय परिसरात उपोषण छेडण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी नगरसेवक रतन पवार, सुरेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, नगरसेवक करामत मिठागरी, नेते इब्राहिम दलवाई, तालुका उपाध्यक्ष मनोज शिंदे, माजी नगरसेविका गौरी रेळेकर, अल्पसंख्याक सेल चिपळूण तालुकाध्यक्ष अनवर जबले, अशोक डाकवे, वासुदेव मेस्त्री, संजय साळवी, नंदकुमार कामत, अक्रम खान, रुपेश शिगवण, संजय शिगवण, गणेश शिगवण, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, उपाध्यक्ष रुपेश आवले, चिपळूण शहाराध्यक्ष फैसल पिलपिले, रेशमा पवार जयश्री खांबे, वनिता पवार, अबुल बेबल, रहुल भेलेकर, करीम भेलेकर, इक्बाल बेबल, सलमान चौगुले, ऋषिकेश शिंदे, शकील शेख, महेंद्र डिगे उपोषणाला उपस्थित होते.