काँग्रेसचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष साळवी यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:15+5:302021-05-20T04:34:15+5:30
चिपळूण : काँग्रेसचे ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, हा राजीनामा ओबीसी विभाग ...
चिपळूण : काँग्रेसचे ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, हा राजीनामा ओबीसी विभाग प्रांताध्यक्ष भानुदास माळी व माजी प्रांताध्यक्ष प्रमोद मोरे यांच्याकडे पाठवला आहे.
खेर्डी येथील प्रकाश साळवी हे गेली काही वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. या दोन्ही क्षेत्रात वावरत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेऊन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम यांच्या शिफारशीवरून ओबीसी विभाग प्रांताध्यक्ष प्रमोद मोरे यांनी काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी साळवी यांच्यावर सोपवली होती. या पदाला साळवी यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला.
आपल्या या पदाच्या कारकिर्दीत ओबीसी विभाग ९ तालुकाध्यक्षपदी निवड केली. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मात्र, आता साळवी यांनी वैयक्तिक कारणामुळे आपण पक्ष कार्यास वेळ देऊ शकत नाही, असे राजीनामा पत्रात नमूद आहे.