महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:20+5:302021-06-23T04:21:20+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : देशभरात विविध क्षेत्रांसह समाजकारण आणि राजकारणात महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात ...

Consider the safety of women | महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करा

महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : देशभरात विविध क्षेत्रांसह समाजकारण आणि राजकारणात महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात महिला सबलीकरण, नारी शक्तीचा उदोउदो सुरू आहे. दुसरीकडे, चिपळुणातील एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही बाब गंभीर असून, आरोपीवर योग्य ती कठोर कारवाई करावी. पोलिसांनी गस्त वाढवून येथील महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे करण्यात आली़ याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे देण्यात आले.

येथील प्रांताधिकारी पवार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा सचिव प्रणिता घाडगे म्हणाल्या की, शहरात भोंगाळे परिसरात भरवस्तीत सायंकाळच्या वेळेस रुग्णालयात कामावर निघालेल्या परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाला आहे. ही घटना चिपळूणकरांसाठी आणि येथील प्रशासन व्यवस्थेसाठी खूप खळबळजनक व घाबरून सोडणारी आहे. या घटनेमुळे शहर व परिसरात भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. गजबजलेल्या शहरवस्तीत अत्याचार होऊ लागल्यास शहरातील अनेक मुली, तसेच आसपासच्या गावांमधून शहरात कामानिमित्त येणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण होतो. लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ आणि रहदारीची ठिकाणे सुनसान आहेत. त्याचा गैरफायदा असे नराधम घेत आहेत. त्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. अन्य कोणासोबत असा अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या खुशी हरदरे, राजश्री पवार, अनन्या महाडिक उपस्थित होत्या.

-------------------

महिलांच्या सुरक्षिततेबाबत राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले़

Web Title: Consider the safety of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.