कोकणात काजू बोंडापासून इथेनॉल निर्मिती, पहिला प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 02:14 PM2019-03-29T14:14:45+5:302019-03-29T14:17:55+5:30

कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून इथेनॉल निर्मितीसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालानंतर पथदर्शी प्रकल्पाच्या हालचाली सुरु झाल्या असून लवकरच काजू बोंडा पासून कोकणातील पहिला इथेनॉल निर्मितीपथदर्शी प्रकल्प उभारण्याला परवानगी व आर्थिक सहकार्य देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Construction of ethanol from Cashew Bonda in Konkan, started construction of first project | कोकणात काजू बोंडापासून इथेनॉल निर्मिती, पहिला प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु

कोकणात काजू बोंडापासून इथेनॉल निर्मिती, पहिला प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देकोकणात काजू बोंडापासून इथेनॉल निर्मितीपहिला प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु

दापोली : कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून इथेनॉल निर्मितीसाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या अहवालानंतर पथदर्शी प्रकल्पाच्या हालचाली सुरु झाल्या असून लवकरच काजू बोंडा पासून कोकणातील पहिला इथेनॉल निर्मितीपथदर्शी प्रकल्प उभारण्याला परवानगी व आर्थिक सहकार्य देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे चालू हंगामातील वाया जाणारी काजू बोंडे वापरात येण्याची शक्यता निर्माण झाली असून काजू बागायतदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .

महाराष्ट्रात काजू बोंडापासून वाइन, फेणीनिर्मितिला मान्यता नसल्याने लाखों टन काजूची बोंडे वाया जात आहेत. काजू बोंडा वर प्रक्रिया करणारे १० % उद्योग असल्याने ९० % काजू बोंडे वाया जात आहेत. काजू ची बोंडे वाया जात असल्याने शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे , परंतु काजू बोंडा पासून ईंथॉनॉल शक्य असल्याने काजू बी व बोंडा पासून दुहेरी फायदा होणार आहे . वाया जाणाऱ्या काजू बोंडा पासून शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळेल, हे नक्की आहे.

Web Title: Construction of ethanol from Cashew Bonda in Konkan, started construction of first project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.