गॅस सिलिंडरच्या दिरंगाईमुळे ग्राहकांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:36+5:302021-08-20T04:35:36+5:30
जाकादेवी : खालगाव-जाकादेवी परिसरात रत्नागिरीतील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या ग्राहकांना आठवडाभर वेटिंग करूनही गॅस सिलिंडर प्राप्त होत नसल्याने ग्राहकांची अडचण ...
जाकादेवी : खालगाव-जाकादेवी परिसरात रत्नागिरीतील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या ग्राहकांना आठवडाभर वेटिंग करूनही गॅस सिलिंडर प्राप्त होत नसल्याने ग्राहकांची अडचण हाेत आहे. गॅस नाेंदणी करूनही या गॅस पुरवठा एजन्सीवर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जाकादेवी परिसरात शांतादुर्गा गॅस एजन्सीचे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ग्राहकांची संख्या मोठी असूनही गॅस सिलिंडर पुरवण्यात रत्नागिरीहून फार मोठी दिरंगाई होत आहे. ऐन पावसाळ्याच्या हंगामात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना फार मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी ऑनलाइन नोंदणी करूनही लवकर मेसेज न येणे, गॅस सिलिंडर पुरवण्यात दिरंगाई होणे यामुळे खालगाव जाकादेवी परिसरातील ग्राहकांनी शांतादुर्गा गॅस एजन्सीवर नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरातील ग्राहकांना लवकरात लवकर गॅस सिलिंडर पुरवावेत, अशी आग्रही मागणी येथील ग्राहकांनी शांतादुर्गा गॅस एजन्सीकडे केली आहे.