जिल्ह्यात पावसाची संततधार, चिपळुणातील वाशिष्ठी, शिवनदीने ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:58 PM2020-07-04T16:58:25+5:302020-07-04T17:16:33+5:30

गेले काही दिवस सरीवर कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुसळधार कोसळण्यास सुरूवात केली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी आणि शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, चिपळुणातील बाजारपुलाला पाणी टेकायला आले आहे.

Continuous rains in the district, Vashishti in Chipluna, danger level crossed by Shivanadi | जिल्ह्यात पावसाची संततधार, चिपळुणातील वाशिष्ठी, शिवनदीने ओलांडली धोक्याची पातळी

जिल्ह्यात पावसाची संततधार, चिपळुणातील वाशिष्ठी, शिवनदीने ओलांडली धोक्याची पातळी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाची संततधारचिपळुणातील वाशिष्ठी, शिवनदीने ओलांडली धोक्याची पातळी

रत्नागिरी : गेले काही दिवस सरीवर कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुसळधार कोसळण्यास सुरूवात केली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी आणि शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, चिपळुणातील बाजारपुलाला पाणी टेकायला आले आहे.

गेले काही दिवस दिवसा ऊन आणि रात्री पावसाची एखादी सर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. जून महिन्याच्या सुरूवातीला कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे आटोपून घेतली होती. भाताची रोपे तयार होत असतानाच पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी भाताची लावणी रखडली होती. पावसाअभावी शेतजमिनींना भेगा पडण्यास सुरूवात झाली होती. दिवसभर कडाक्याचे ऊन पडत असल्याने उकाडाही वाढला होता. त्यामुळे सर्वांनाच पावसाची आतुरता लागून राहिली होती.

सरीवर कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुसळधार कोसळण्यास सुरूवात केली आहे. पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यातील नद्या दुभड्या भरून वाहू लागल्या आहेत. चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, रात्रभर पाऊस कोसळल्याने हवेत गारवा आला होता

Web Title: Continuous rains in the district, Vashishti in Chipluna, danger level crossed by Shivanadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.