सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर ठेकेदार धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:36+5:302021-03-25T04:29:36+5:30

चिपळूण : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चिपळूण विभागाच्या अख्यत्यारीतील ठेकेदारांची ५० कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते ...

Contractors hit the Public Works Department office | सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर ठेकेदार धडकले

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर ठेकेदार धडकले

Next

चिपळूण : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चिपळूण विभागाच्या अख्यत्यारीतील ठेकेदारांची ५० कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत आले आहेत. या बिलांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप ठेकेदारांना बिले मिळालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ठेकेदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते कार्यालयात धडकले आणि त्यांनी कार्यकारी अभियंता उत्तमकुमार मुळे यांची भेट घेऊन जाब विचारला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यतारीत रस्ते, पूल, साकव यासारखी कामे केली जातात. याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो. मात्र, काही वेळा वेळेत निधी उपलब्ध न झाल्यास ठेकेदार अडचणीत येतात. यानुसार गेल्या वर्षापासून ठेकेदारांनी आतापर्यंत केलेल्या कामांची ५० कोटी रुपयांची बिले सार्वजनिक बांधकाम खात्याकडे थकीत राहिली आहेत. ही बिले मिळावी यासाठी ठेकेदारासह सुशिक्षित बेरोजगार अभियंते सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, मार्चअखेर आला तरी बिले अजून मिळाली नाहीत. यामुळे ठेकेदारांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे बँकांच्या थकीत कर्जासह कामगारांची बिले भागविणे अवघड बनले आहे. यामुळे ठेकेदारांसह सुशिक्षित बेरोजगार अभियंते अडचणीत आले आहेत.

या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील ठेकेदारासह सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी कार्यकारी अभियंता मुळे यांची भेट घेऊन जाब विचारला. थकीत बिले येत्या काही दिवसांत मिळाली पाहिजेत, अशी आग्रही मागणी केली. अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही दिला. यानंतर कार्यकारी अभियंता मुळे यांनी येत्या मार्च अखेरपर्यंत आपली मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.

यावेळी चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे सुरेश चिपळूणकर, रत्नागिरी जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष विशाल शेले, जिल्हाध्यक्ष रणजीत डांगे, अभिजीत जाधव, गणेश कांबळे मंगेश माटे आदी उपस्थित होते.

Web Title: Contractors hit the Public Works Department office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.