कृषी मंत्रालयाकडून आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:53+5:302021-04-23T04:34:53+5:30
रत्नागिरी : सध्या कोरोना संसर्ग वाढत असल्याने शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने खरीप हंगामामध्ये बियाणे, खते व कीटकनाशकांच्या ...
रत्नागिरी : सध्या कोरोना संसर्ग वाढत असल्याने शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने खरीप हंगामामध्ये बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठयाबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतूकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींच्या निवारणाकरिता कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या निर्देशानुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहे.
या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधण्यासाठी ८४४६११७५०० या भ्रमणध्वणी क्रमांकावर तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावरसुद्धा संपर्क करता येईल. काही अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या मेलवरसुद्धा पाठविता येईल.
संबंधितांनी उपरोक्त भ्रमणध्वनी, टोल फ्री क्रमांक तसेच ई-मेलवर येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशील द्यावा किंवा ही माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हाॅटस्ॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल.
ज्या शेतकऱ्यांना व्हाॅटस्ॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी वरील भ्रमणध्वनीवर तोंडी तक्रारी नोंदवाव्यात, असे कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी कळविले आहे.