गुहागरात सहकारी संस्था कारवाईच्या कचाट्यात

By admin | Published: April 27, 2016 10:03 PM2016-04-27T22:03:26+5:302016-04-27T23:46:22+5:30

अकरा संस्था बंद होणार? : चाळीस निष्क्रीय संस्थांना कायमस्वरुपी टाळे

Cooperative action in Guhagar | गुहागरात सहकारी संस्था कारवाईच्या कचाट्यात

गुहागरात सहकारी संस्था कारवाईच्या कचाट्यात

Next

शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील एकूण १२६ विविध सहकारी संस्थांपैकी ४० निष्क्रीय संस्थांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, अकरा संस्था रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील उर्वरित संस्थांना वेळोवेळी अपडेट राहावे लागणार आहे.
सहकार खात्याने सुरू केलेल्या बिनकामी संस्था स्वच्छता मोहिमेमुळे संस्था काढणाऱ्यांवरही चांगलाच लगाम ताणला गेला आहे. कार्यकुशल संस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही सहकार खात्याला यापुढे पेलावी लागणार आहे.
गुहागर तालुक्यातील ४० संस्थांची नोंदणी कायमची रद्द केली आहे व अकरा संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यापुढे उठसूट संस्था उघडणाऱ्यांना या कारवाईमुळे चांगलीच चपराक बसली आहे. अवसायनात काढलेल्या गुहागरातील संस्थांमध्ये गुहागर तालुका नागरी सहकारी पतसंस्था, शृंगारतळी, ओम गंगागिरी, गिमवी बौध्दजन चिखली, लक्ष्मी अडूर, समृद्धी ग्रामीण बिगर सहकारी हेदवी, श्री दशरथ हेदवी, विविध कारागीर ग्रामीण औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था, सावित्रीबाई फुले महिला, जीवनदायी देवी महिला तवसाळ, धनलक्ष्मी नरवण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्धे, अलफलाह पडवे, सिद्धिविनायक आळंबी उत्पादक सहकारी संस्था, आरे, चणकाई महिला मंडळ, चिंद्रावळे, गुहागर तालुका अपंग पतसंस्था, वेळणेश्वर, वेळणेश्वर मागासवर्गीय संस्था, गुहागर, श्री महामाई सोनसाखळी देवी महिला सहकारी संस्था, तवसाळ, धोपावे पाणीपुरवठा संस्था, धोपावे, नम्रता पर्यटन विकास, गुहागर, वंदे मातरम जलक्रीडा सहकारी संस्था, तवसाळ, गुहागर बेरोजगार सर्व सेवा सहकारी संस्था, गुहागर, श्री रामेश्वर बेरोजगार तवसाळ आगर, कालिका बेरोजगार, कर्दे, दशभूज लक्ष्मी गणेश खारभूमी विकास हेदवी, नरवण खारभूमी, नरवण, दत्तकृपा खारभूमी, पालशेत, एकलव्य स्वयंरोजगार सेवा उद्योग, तवसाळ, आदर्श स्वयंरोजगार, मढाळ, युवा आदर्श स्वयंरोजगार, गुहागर, निर्मिती स्वयंरोजगार, पडवे, मंगलमूर्ती स्वयंरोजगार, गुहागर, प्रकाश स्वयंरोजगार, तवसाळ, अंजुमन स्वयंरोजगार, अंजनवेल, संत गोरोबाकाका स्वयंरोजगार नरवण, स्वयंरोजगार सेवा अंजनवेल, गोपाळकृष्ण स्वयंरोजगार संस्था, गुहागर, जननी स्वयंरोजगार शृंगारतळी, सागरदीप स्वयंरोजगार संस्था, पालशेत, न्यू आदर्श स्वयंरोजगार संस्था, वेलदूर, राणोबा स्वयंरोजगार संस्था, गुहागर, प्रथमेश स्वयंरोजगार संस्था, गुहागर, सागररत्न स्वयंरोजगार, वेलदूर अशा अनेक संस्था सहकार खात्याने आता मोडीत काढल्या आहेत.
राज्यभरात सुरू असलेल्या अशा सहकार खात्याच्या स्वच्छता मोहिमेमुळे कागदोपत्री पसारा कमी होणार असला तरी सहकारातून समृद्धीकडे जाणारी वाट मात्र अंधारमय होत चालली असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)

Web Title: Cooperative action in Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.