corona in ratnagiri- चिमुरडीने वाचविले एका बालकाला, प्रसंगावधानामुळे होत आहे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 02:57 PM2020-04-09T14:57:21+5:302020-04-09T14:59:08+5:30

देवरुख येथील केशवसृष्टी येथे राहणाऱ्या सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात या बालिकेने एका अडीच वर्षांच्या बालकाला सांडपाण्याच्या टाकीमध्ये पडता पडता वाचविले. तिच्या या समयसुचकतेमुळे, प्रसंगावधानामुळेच त्या बाळाला मदतीचा हात मिळाला. सुज्ञा (रमा)च्या या कृत्यामुळे दोन्ही कुटुंबातून तिचे कौतुक होत आहे.

coron | corona in ratnagiri- चिमुरडीने वाचविले एका बालकाला, प्रसंगावधानामुळे होत आहे कौतुक

corona in ratnagiri- चिमुरडीने वाचविले एका बालकाला, प्रसंगावधानामुळे होत आहे कौतुक

Next
ठळक मुद्दे चिमुरडीने वाचविले एका बालकालाप्रसंगावधानामुळे होत आहे कौतुक

सचिन मोहिते 

देवरुख : येथील केशवसृष्टी येथे राहणाऱ्या सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात या बालिकेने एका अडीच वर्षांच्या बालकाला सांडपाण्याच्या टाकीमध्ये पडता पडता वाचविले. तिच्या या समयसुचकतेमुळे, प्रसंगावधानामुळेच त्या बाळाला मदतीचा हात मिळाला. सुज्ञा (रमा)च्या या कृत्यामुळे दोन्ही कुटुंबातून तिचे कौतुक होत आहे.

बऱ्यांचदा लहान मुले अधिक हजरजबाबीपणा दाखवतात आणि साऱ्यांनाच आश्चर्यचकीत करतात. आपल्या हुशारीने ती मोठ्यांनाही चक्रावून सोडतात.एखाद्या अवघड प्रसंगात असं काही करतात की त्यामुळे मोठी माणसेही तोंडात बोटे घालतील. याचीच अनुभूती देवरूखच्या सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात या तीन वर्षाच्या चिमुरडीने दिली.

सुज्ञा उर्फ रमा सुहास थोरात ही तीन वर्षे १० महिन्यांची मुलगी. संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांची ती कन्या. बुधवारी दुपारी सुज्ञा अंगणात खेळत होती. शेजारच्या लिमये यांचा अडीच वर्षांचा नातू श्रीकर हा तिच्या सोबत खेळण्यासाठी आला होता. खेळता खेळता घरच्यांची नजर चुकवून हे दोघेही जरा बाजूला गेले.

घराजवळच असलेल्या मोठ्या सांडपाण्याच्या टाकीमध्ये त्यांचे खेळणे पडले. हे खेळणे काढण्यासाठी पुढे झालेला अडीच वर्षांचा श्रीकर हा त्या टाकीमध्ये पाय घसरुन पडणार हे सुज्ञा हिच्या लक्षात येताच तिने क्षणाचाही विलंब न लावता श्रीकरचा हात घट्ट पकडून ठेवला.

यावेळी दोघेही ओरडल्याने श्रीकरच्या घरच्यांनी त्यांचा आवाज ऐकून त्या दिशेने धाव घेतली आणि पडणाºया श्रीकरला पडता पडता सावरला. सुज्ञाच्या समयसुचकतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे धोका टळला. तिने दाखवलेल्या धाडसामुळे श्रीकरला मदतीचा हात मिळाला आणि त्याचे प्राण वाचले. देवरूखात सोशल मीडियावरही याच विषयाची चर्चा अधिक होत आहे.

Web Title: coron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.