coron in ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यातील ४१३ अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:20 PM2020-05-09T14:20:56+5:302020-05-09T14:22:28+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असतानाच जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असतानाच जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी निगेटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत आहे.
शुक्रवारी सायंकाळी आलेले १८० आणि रात्री उशिरा आलेले २३३ असे एकूण ४१३ कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरी शहरातील कोरोनाबाधित नर्स विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या एकूण सर्व अहवालांची संख्या २३३ आहे. जिल्हा रूग्णालयाल प्राप्त आलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये रत्नागिरीतील ४४, दापोली २२, राजापूर २६, लांजा १०, संगमेश्वर ३८, कामथे ६३, गुहागर ६, मंडणगड १५, कळंबणीतील ३ अहवालाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी १८० अहवाल प्राप्त झाले होते. शुक्रवारी रात्री २३३ अहवाल आले आहेत.
मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना जिल्ह्यातील विविध भागात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांचे अहवाल प्राप्त होत आहेत. यातील बहुतांशी अहवाल निगेटिव्ह येत असून, जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेले रूग्णदेखील मुंबईवरून आलेलेच आहेत.