कोरोना जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:21 AM2021-06-28T04:21:52+5:302021-06-28T04:21:52+5:30
२. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून दापोली रुग्णालयाला ऑक्सिजन संयंत्र मंजूर झाले असल्याने दापोलीकरांना दिलासा मिळाला आहे. ...
२. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून दापोली रुग्णालयाला ऑक्सिजन संयंत्र मंजूर झाले असल्याने दापोलीकरांना दिलासा मिळाला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रभू यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना १९ मे रोजीच्या पत्रान्वये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री केअर्स फंडांतर्गत ऑक्सिजन संयंत्र स्थापित करण्याबाबत मागणी केली होती. पीएम केअर फंडाच्या माध्यमातून ऑक्सिजन संयंत्र मंजूर केले आहे.
३. घरातील कमावत्या पुरुषाचे आकस्मिक निधन झाल्याने संकटात सापडलेल्या भुते कुटुंबाला जैतापूर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला आहे. माडाच्या झाडावर चढण्यात सराईत असलेले प्रकाश भुते बुधवारी माडी काढायला गेले होते. माडाच्या बागेत प्रकाश यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.