मे महिना कोरोना विस्फोटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:48+5:302021-06-05T04:23:48+5:30

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. मे महिना तर कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या ...

Corona explosives in May | मे महिना कोरोना विस्फोटक

मे महिना कोरोना विस्फोटक

Next

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. मे महिना तर कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या संख्येसाठी विस्फोटक ठरला आहे. या एकाच महिन्यात १४ हजार १५६ एवढे रुग्ण वाढले तर ४६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ३९,०४७ जण बाधित झाले. तर १२७९ रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोनाचे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत आपले रूप अधिक भयावह झाले आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर शिमगोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांमुळे रुग्णसंख्या भरमसाठ वाढू लागली. १८ मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एकच होती. मात्र, तरीही अख्खा जिल्हा हादरला होता. दुसरा रुग्ण ३ एप्रिल रोजी सापडला. ३१ मार्च २०२१ पर्यंत रुग्णसंख्या ११,०२९ वर पोहोचली तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३७६ होती. मात्र, गेल्या दोन महिन्याचा आढावा घेतला तर कोरोनाचे जिल्ह्यात केवढा जलदगतीने फैलाव झाला आहे, त्याची कल्पना येते. गेल्या तीन महिन्याची आकडेवारी पाहता या मार्च महिन्यात १०५५ इतकी रुग्णसंख्या वाढली आणि ११ जणांचे मृत्यू झाले. एप्रिल या एकाच महिन्यात ११,२५४ रूग्ण वाढले. म्हणजेच एका महिन्यात ११ हजारपेक्षा अधिक रुग्णांची वाढ झाली आणि या महिन्यात २८० जणांचे मृत्यू झाले.

मे महिना तर गेल्या सव्वा वर्षातील कोरोनाचा सर्वात विस्फोटक महिना ठरला आहे. या महिन्यात तब्बल १४,१५६ कोरोना बाधित झाले आणि त्यापैकी ४६० जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला.

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात बाधित होणाऱ्यांची संख्या अतिवेगाने वाढू लागली आहे. आतापर्यंत ३९ हजार जण बाधित झाले असून १२७९ जणांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने जिल्ह्यासाठी ही बाब चिंताजनक आहे.

चौकट

गेल्या वर्षी ३० मेअखेरपर्यंत कोरोनाचे रुग्ण ३५२ होते. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, या वर्षी रुग्णसंख्या ३६,४३९ इतकी झाली आहे. तर १२३९ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच या वर्षभरात तब्बल ३९,०४७ ने रुग्णांमध्ये वाढ झाली आहे तर मृत्यू १२७८ झाले. त्यापैकी या तीन महिन्यात तब्बल २६,४६५ जण कोरोनाबाधित झाले त्यापैकी ७५१ जणांचा मृत्यू झाला.

चौकट

महिना रुग्ण मृत्यू

मार्च २० १ ०

एप्रिल २० ६ १

मे ९ २८१

मार्च २१ १०५५ ११

एप्रिल २१ ११,२५४ २८०

मे २१ १४१५६ ४६०

Web Title: Corona explosives in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.