कोरोना काळात मोफत ‘बूस्टर डोस’ ठरतोय गुणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:32 AM2021-05-10T04:32:14+5:302021-05-10T04:32:14+5:30

यशवंत पेंढांबकर यांच्या कोरोना काढ्याची सर्वत्र चर्चा यशवंत पेंढांबकर यांच्या कोरोना काढ्याची सर्वत्र चर्चा चिपळूण : तालुक्यातील कामथे नं. ...

Corona is a free booster dose | कोरोना काळात मोफत ‘बूस्टर डोस’ ठरतोय गुणकारी

कोरोना काळात मोफत ‘बूस्टर डोस’ ठरतोय गुणकारी

Next

यशवंत पेंढांबकर यांच्या कोरोना काढ्याची सर्वत्र चर्चा

यशवंत पेंढांबकर यांच्या कोरोना काढ्याची सर्वत्र चर्चा

चिपळूण : तालुक्यातील कामथे नं. २ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यशवंत चंद्रकांत पेंढांबकर यांनी कोरोना संकट काळात समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोना काळात मानवी शरीराला अत्यंत गुणकारी असलेला ‘बूस्टर डोस’ आयुर्वेदिक चहाचा काढा ते दिवसभर शहरात त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत देत आहेत.

पेंढांबकर आपल्या दुचाकीवरून रस्त्यात जे- जे कोणी ओळखीचे, अनोळखीचे भेटतील त्यांना चहा घेता का, असे आदरपूर्वक विचारून ते प्रत्येकाला एक कप चहा अगदी मोफत देतात. दिवसभारातून दोन ते तीन वेळा ते घरी चहा बनवतात. यातून सुमारे ४० ते ५० कप चहाचे दिवसभर वाटप होते, जनसेवा हीच ईश्वर सेवा, असे मानून पेंढांबकर हे सामाजिक कार्य मागील लॉकडाऊनपासून करीत आहेत. चिंचनाका येथे सेवेत असलेले पोलीस, होमगार्ड यांच्यासह बाजारपेठ, बस स्टँड परिसर, पागनाका, देसाई बाजार इत्यादी ठिकाणी ते चहाचे वाटप करतात.

कोट

यशवंत पेंढांबकर यांचे सामाजिक कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. मागील वर्षीपासून त्यांचे कोविड योद्धा म्हणून काम आम्ही जवळून पाहत आहोत. सध्याच्या काळात माणसाच्या शरीरातील इम्युनिटी पॉवर चांगली होणे गरजेचे आहे. अशा काळात आयुर्वेदिक चहाचा काढा ठिकठिकाणी मोफत वाटण्याचा पेंढांबकर यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

-राजू जाधव, चिपळूण

Web Title: Corona is a free booster dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.