कोरोना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:22+5:302021-07-08T04:21:22+5:30
२. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत कोरोनाने कहरच केला होता. बालकांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाने ...
२. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत कोरोनाने कहरच केला होता. बालकांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाने आतापर्यंत १,८२५ जणांचा मृत्यू झाला असून, ५७,१८१ रुग्णांनी कारोनावर मात केली आहे. तर सध्या ४,९८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चालल्याने आरोग्य यंत्रणेकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
३. कोविडच्या परिस्थितीचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. लाखो उच्चशिक्षित लोक अचानक बेरोजगार झाले आहेत. शिक्षणावर प्रचंड पैसा खर्च करुनही त्यांना अपेक्षित यश तर मिळाले नाहीच उलट नुकसानच झाल्याने डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. कामधंदा, नोकरी नसल्याने सुशिक्षितांचे हाल झाले आहेत. काहींनी तर मोठ्या नोकऱ्या मिळाल्याने फ्लॅट घेतले. मात्र, सध्या नोकरी नसल्याने कर्जाचे हप्ते कुठून भरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.