कोरोना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:05+5:302021-07-09T04:21:05+5:30
२. कोरोनाच्या संकटामध्ये नागरिक सापडलेले आहेत. परंतु सध्या शेत व वृक्षलागवड बागायतीची साफसफाई, खत घालणे अशी कामे सुरू आहेत. ...
२. कोरोनाच्या संकटामध्ये नागरिक सापडलेले आहेत. परंतु सध्या शेत व वृक्षलागवड बागायतीची साफसफाई, खत घालणे अशी कामे सुरू आहेत. यामध्ये दुर्दैवाने सर्पदंश झाला. विंचू चावला तर उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे कोविड सेंटर सुरू असल्यामुळे सर्प, विंचू व श्वानदंशावर उपचार केले जात नाहीत. हे दुसरे फार मोठे संकट आहे. शेतकऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये उपचार करणे परवडणारे नाही.
३. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातर्फे उत्कर्ष मंडळ, गोरिवलेवाडी कोतळूक येथे जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांच्या पुढाकाराने आबलोली प्राथमिक आराेग्य केंद्राच्या सर्व आशासेविका व आराेग्य कर्मचारी यांचा कोविडयोद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदस्या ठाकूर यांनी कोरोनाकाळात आपल्या गटात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्यांना मोठा आधार दिला.