कोरोना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:18+5:302021-07-12T04:20:18+5:30
२. कोविड-१९ ची गुहागर तालुक्यातील ग्रामीण भाग हॉट स्पॉट व उद्रेक ठिकाणे घोषित करण्यात येत आहेत. यामध्ये २ ...
२. कोविड-१९ ची गुहागर तालुक्यातील ग्रामीण भाग हॉट स्पॉट व उद्रेक ठिकाणे घोषित करण्यात येत आहेत. यामध्ये २ हॉट स्पाॅट, तर ४ उद्रेक ठिकाणे घोषित करण्यात आली आहेत. तालुक्यात एकूण ३२ कंटेनमेंट झोन आहेत. तालुक्यात ३०३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. दररोज ५५० चाचण्यांमुळे कोविड ट्रेस जलदगतीने होत आहे. यापूर्वी कोरोनाचा एकही रुग्ण नसलेली गावे व वाड्यांमधून सर्वाधिक रुग्ण मिळू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
३. खेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार आणखी २९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५,२९५ इतकी झाली आहे. आतापर्यंत ४,८१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून २८२ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. दिवसभरात ९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तालुक्यातील बळींची संख्या २०१ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे.