परिषद भवनात पुन्हा कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:20+5:302021-05-06T04:33:20+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने तळमजल्यावरील तपासणी मोहीम अधिक वेगाने सुरू करण्यात आली आहे. ...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने तळमजल्यावरील तपासणी मोहीम अधिक वेगाने सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण विभागात अधीक्षकपदावर काम करणारे एक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबाधित सापडले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. स्वॅब नमुन्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुजू होण्याची सूचना संबंधित अधीक्षकाला करण्यात आली आहे.
यापूर्वी परिषद भवनातील महिला बालकल्याण, आरोग्य, ग्रामपंचायत, कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळेच परिषद भवनात अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. परिषद भवनाच्या तळमजल्यावर आरोग्य विभागामार्फत स्वॅब नमुने संकलित करण्याची माेहीम अजूनही सुरू आहे. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय परिषद भवनात अन्य कोणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.