कोरोनामुळे अँटिजन चाचणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:36 AM2021-09-06T04:36:30+5:302021-09-06T04:36:30+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेमध्ये कर्मचारीच नसल्याने स्वॅब तपासणीसाठी आता मुंबईला पाठविण्यात येत असल्याचा आराेप करण्यात आला आहे. ...

Corona initiates antigen testing | कोरोनामुळे अँटिजन चाचणीस प्रारंभ

कोरोनामुळे अँटिजन चाचणीस प्रारंभ

Next

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेमध्ये कर्मचारीच नसल्याने स्वॅब तपासणीसाठी आता मुंबईला पाठविण्यात येत असल्याचा आराेप करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची ठरलेली मुदत संपली असून, नव्याने कर्मचारी नियुक्ती केलेली नाही, असेही म्हटले आहे. मात्र, हे आराेप चुकीचे असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी म्हटले आहे.

लायन्स क्लब सावर्डेतर्फे सावर्डे विभागातील कोरोना रुग्णांसाठी व इतर आजारांच्या दरम्यान ज्यांना सतत काॅन्सन्ट्रेटरची गरज लागते अशा गरजू व गरीब रुग्णांसाठी या उपकरणाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या वेळी लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष गिरीश कोकाटे, प्रकाश राजेशिर्के यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या वेळी अध्यक्ष विजय राजेशिर्के, चंद्रकांत सावर्डेकर, डाॅ. नीलेश पाटील, आरती निकम, डाॅ. कृष्णकांत पाटील, डाॅ. अमोल निकम उपस्थित होते.

Web Title: Corona initiates antigen testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.