मिरकरवाड्यात खलाशांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:10+5:302021-04-19T04:28:10+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मिरकरवाडा जेटीवरील मासेमारी नौकांमधील खलांशाची आरोग्य विभागाच्या पथकाकडून काेराेना तपासणी ...
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मिरकरवाडा जेटीवरील मासेमारी नौकांमधील खलांशाची आरोग्य विभागाच्या पथकाकडून काेराेना तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार शहर परिसरातील व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांचीही कोरोना तपासणी आरोग्य पथकाकडून करण्यात येत आहे. कोरोनामुळे संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली आहे. मत्स्यव्यवसाय खात्याकडून मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त सूचना नौका मालकांना देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश नौका किनारी नांगरावर आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्वत्र कोविड नियम पाळण्यात येत आहेत. त्याप्रमाणे मच्छीमारांनीही या नियमांचे पालन करावे, यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. प्रत्येक नौकांवरील खलाशांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक शनिवारी मिरकरवाडा जेटीवर दाखल झाले होते. या पथकाने नौकांवरील खलाशांची कोरोना तपासणी केली.