कोरोनाने १६ रुग्णांचा मृत्यू, ५८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:30 AM2021-05-01T04:30:52+5:302021-05-01T04:30:52+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने १६ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या ६५६ झाली आहे तर कोरोना पाॅझिटिव्ह ५८८ रुग्ण आढळले ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने १६ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या ६५६ झाली आहे तर कोरोना पाॅझिटिव्ह ५८८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित एकूण २२,२८३ रुग्ण झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने अनेक जणांचा बळी जात असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये चिपळूण, रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी ४ रुग्ण, लांजात ३ आणि गुहागर, संगमेश्वर, मंडणगड, खेड, राजापूर या तालुक्यांतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ५ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे प्रमाण २.९४ टक्के आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये १४ तर खासगी रुग्णालयांमध्ये २ रुग्ण मृत्यू झाले आहेत.
शुक्रवारी सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त १६७ रुग्ण तर सर्वांत कमी ६ रुग्ण मंडणगड तालुक्यात आहेत तर दापोलीत ५० रुग्ण, खेडमध्ये ४४, गुहागरात ९१, चिपळूणात ८८, लांजात ३४ आणि संगमेश्वर, राजापूरमधील प्रत्येकी ५४ रुग्णांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १४.८३ टक्के आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ॲन्टीजेन चाचणीतील २८४ रुग्ण तर आरटीपीसीआर चाचणीतील ३०४ रुग्ण आहेत.