कोरोनाने २४ रुग्णांचा मृत्यू, ६१५ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:29 AM2021-04-26T04:29:08+5:302021-04-26T04:29:08+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ५७६ झाली आहे. ६१५ कोरोना पॉझिटिव्ह ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ५७६ झाली आहे. ६१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित १९,२२४ रुग्ण झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले असून, अवघ्या ३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित एकूण १३,०७६ बरे झाले आहेत.
कोरोनाने मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, मागील दोन दिवसांत शासकीय रुग्णालयांमध्ये २२, तर खासगी रुग्णालयांमध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चिपळूण तालुक्यातील ५ रुग्ण, लांजातील ३ आणि रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, दापोली या तालुक्यातील प्रत्येकी ४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाने १० वर्षांची बालिका, ३० वर्षांची तरुणी आणि ३६ वर्षांच्या तरुणाचाही शनिवारी मृत्यू झाला. उर्वरित चाळिशीपासून ९० वर्षे वयोगटापर्यंत लोक मृत्यू पावले आहेत. त्यामध्ये १० महिला आणि २४ पुरुष आहेत. कोरोना मृतांचे प्रमाण २.९९ टक्के आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील सर्वांत जास्त २३१ रुग्ण सापडले आहेत. मात्र, मंडणगड तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दापोलीत २४ रुग्ण, खेडमध्ये २८ रुग्ण, गुहागरात १४०, चिपळुणात ५२, संगमेश्वरात ७६, लांजात २४ आणि राजापुरात ४० रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण १३.६८ टक्के आहे, तर बरे होण्याचे प्रमाण ६८.१ टक्के आहे.