जिल्ह्यात कोरोनाने २९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:21 AM2021-06-10T04:21:40+5:302021-06-10T04:21:40+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, आणखी तब्बल २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, आणखी तब्बल २९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत एकूण १,४२८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनाचे ५२५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ७२१ झाली आहे.
कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. २४ तासात ४,०१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अँटिजन चाचणीमध्ये २२१ रुग्ण तर आरटीपीसीआर चाचणीत ३०४ रुग्ण आढळले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात ३ रुग्ण, दापोलीत २९, खेडमध्ये ७३, गुहागरात २२, चिपळुणात ११८, संगमेश्वरमध्ये ६०, रत्नागिरीत १५२, लांजात २२, राजापुरात २२ रुग्ण आणि इतर खासगी रुग्णालयातील १० रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २४ तासात मृत्यू झालेल्या ८ जणांमध्ये रत्नागिरीतील ४ रुग्ण, लांजातील २ आणि खेड, चिपळूणमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या मृतांमध्ये मागील २१ रुग्ण असून, त्यामध्ये रत्नागिरीतील ॲपेक्स हॉस्पिटलमधील २ जण, महिला रुग्णालयातील ६, गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७ रुग्ण, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील २, तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील १ आणि सुश्रुषा कोविड केअर सेंटरमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ३.४२ टक्के आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.६८ टक्के आहे.