जिल्ह्यात कोरोनाने ८ रुग्णांचा बळी, नवे २०५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:29 AM2021-07-26T04:29:15+5:302021-07-26T04:29:15+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने ८ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या १,९९६ झाली आहे, तर २०५ बाधित रुग्ण सापडले असून ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने ८ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या १,९९६ झाली आहे, तर २०५ बाधित रुग्ण सापडले असून एकूण ६९,८९९ रुग्ण झाले आहेत. १९० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकूण ६५,३१७ रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण तसेच बरे होण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. जिल्ह्यात ५,७९४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत १४६ आणि ॲंटिजन चाचणीत ५९ बाधित रुग्ण सापडले. बाधित रुग्णांमध्ये मंडणगड, गुहागर आणि लांजा या तालुक्यांमध्ये एक अंकी रुग्ण सापडले असून रत्नागिरी तालुक्यात रुग्णसंख्या जास्त आहे. मंडणगडात ४ रुग्ण, दापोलीत १२, खेडमध्ये ३४, गुहागरात ७, चिपळुणात ४२, संगमेश्वरात २३, रत्नागिरीत ६०, लांजात ९ आणि राजापुरात १४ रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांमध्ये गुहागर, चिपळूण, लांजा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण तसेच संगमेश्वर, राजापूर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये कोमार्बिडचे ८०३ रुग्ण असून, पन्नाशीतील रुग्ण जास्त प्रमाणात मृत्यू पावले आहेत. बाधित रुग्णांचा मृत्युदर २.८६ टक्के असून बरे होण्याचा दर ९३.४४ टक्के आहे. बाधितांमध्ये लक्षणे नसलेले रुग्ण १,८५७ तर लक्षणे असलेले रुग्ण ७२९ आहेत.