कोरोना काळात आता रत्नागिरीतील दुकानातूनही घरपोच वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:50+5:302021-06-16T04:42:50+5:30

रत्नागिरी : सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक दुकानात जाऊन खरेदी करणे टाळू लागले आहेत. यामुळे ऑनलाईन पद्धतीने खरेदीचे प्रमाण ...

In the Corona period, household items are now available from shops in Ratnagiri | कोरोना काळात आता रत्नागिरीतील दुकानातूनही घरपोच वस्तू

कोरोना काळात आता रत्नागिरीतील दुकानातूनही घरपोच वस्तू

Next

रत्नागिरी : सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक दुकानात जाऊन खरेदी करणे टाळू लागले आहेत. यामुळे ऑनलाईन पद्धतीने खरेदीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरीतील ग्राहकांना स्थानिक खात्रीच्या दुकानातून खरेदीचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी Clickinn ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना घरातच सुरक्षित राहून रत्नागिरी शहरातील दुकानांमधील वस्तूंची सेवा घरपोच मिळणार आहे. या ॲपचे लवकरच लोकार्पण होणार आहे.

सध्या काेरोना काळात लोक बाहेर यायलाही घाबरत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरीतील विविध पुरवठादारांकडून घरबसल्या सेवा मिळेल, असे ॲप तयार करायला हवे, असे हेल्पिंग हॅण्डसचे सदस्य आणि महावितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांना प्रकर्षाने वाटले. त्यांनी ही कल्पना रत्नागिरीतील साॅफ्टवेअर इंजिनिअर राहुल भंडारे यांना सांगितली. भंडारे यांनी ही संकल्पना महिनाभरातच मूर्त स्वरूपात आणली. या ॲपची बहुमूल्य मदत कोरोना काळात ग्राहक आणि दुकानदार यांना नक्कीच होणार आहे. यामुळे दुकानात गर्दी न करता, स्थानिक बाजारात खरेदी करण्याचा आनंद ग्राहकांना मिळणार आहे, असा विश्वास रत्नागिरीतील मान्यवर व्यक्त करत आहेत.

Clickinn ॲपचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, मात्र एक दिवसासाठी व्यापाऱ्यांना आपली नोंदणी विनामूल्य करण्याची संधी मिळाली आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲपसोबत टक्कर देण्यासाठी Clickinn ॲप सक्षम आहे. यामुळे ग्राहकांना ऑनलाईन परंतु नेहमीच्या माहितीच्या दुकानदारांच्या सेवा एका दिवसातच, त्याही घरपोच अशा दुहेरी सुविधा देणाऱ्या ॲपची लिंक https://play.google.com/store/apps/details?id=mspiron.click.inn असून, रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ८३२९३११९१२, ७८७५५५७५६७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन हेल्पिंग हॅण्डसच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांकडून मिळणार सेवा...

हे clickinn ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. या ॲपमध्ये स्थानिक दुकानदार सहभागी होत असून, या स्थानिक दुकानदारांची खात्रीची सेवा, मालाची गॅरेंटी, विक्रीपश्चात देखभाल ऑनलाईन खरेदीतील केवळ clickinn या ॲपमधील खरेदीवर उपलब्ध राहील. याशिवाय आपण दिलेल्या पहिल्या Clickinn ऑर्डर्ससोबत N-95 मास्क शुभेच्छा भेट म्हणून दिले जाणार आहेत, अशी माहिती Clickinn ॲपचे विपणन व्यवस्थापक राहुल भंडारे यांनी दिली.

Web Title: In the Corona period, household items are now available from shops in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.