corona in ratnagiri-कोरोनाबाधित परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर, पोलीस बंदोबस्त तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:40 AM2020-04-13T11:40:33+5:302020-04-13T11:41:58+5:30

रत्नागिरी शहरामध्ये राजीवडा - शिवखोल भागात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर या भागापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागावर आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

corona in ratnagiri - Drone camera monitored at Coronad area, police deployed | corona in ratnagiri-कोरोनाबाधित परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर, पोलीस बंदोबस्त तैनात

corona in ratnagiri-कोरोनाबाधित परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर, पोलीस बंदोबस्त तैनात

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधित परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर, पोलीस बंदोबस्त तैनातरत्नागिरीतील राजीवडा - शिवखोल परिसरावर करडी नजर

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये राजीवडा - शिवखोल भागात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर या भागापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागावर आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

शहरातील राजीवडा - शिवखोल भागात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर हा भाग सील करण्यात आला आहे. या भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या भागात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी याच भागांमध्ये लोकांनी अनावश्यक जमाव केला होता. त्यामुळे वातावरण बिघडले होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच नियंत्रणात आणली.

या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या बरोबरीने आता शहरातील दोन्ही कंटेनमेंट झोनवर ड्रोन कॅमेरांच्या सहाय्याने पाहणी करण्यात येत आहे, असे रत्नागिरी पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी कृपया घरीच राहून आम्हाला सहकार्य करावे, जर कोणी कायदा मोडून बाहेर फिरताना दिसलं तर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: corona in ratnagiri - Drone camera monitored at Coronad area, police deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.