corona in ratnagiri -हुश्श! रत्नागिरीतील आणखी दोन पॉझिटीव्ह झाले निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:13 AM2020-04-22T11:13:00+5:302020-04-22T11:14:41+5:30
रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील दोन कोरोनाबाधीत महिलांचा उपचारानंतरचा आहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यासह अन्य ५१ अहवालही निगेटीव्ह आल्याने रत्नागिरीच्या प्रशासनावरील आणि आरोग्य यंत्रणेवरीण ताण काहीसा कमी झाला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील दोन कोरोनाबाधीत महिलांचा उपचारानंतरचा आहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यासह अन्य ५१ अहवालही निगेटीव्ह आल्याने रत्नागिरीच्या प्रशासनावरील आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे.
जिल्ह्यातून ६८ जणांचे स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी मिळून त्यातील ५२ जणांचे अहवाल जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले. या अहवालानुसार साखरतर येथील दोन्ही महिलांचा कोरोनाचा अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला आहे.
याशिवाय कामथे उपजिल्हा रुग्णालयातील १०, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील ४० रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आहेत. आता फक्त १६ आहवालांची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सहा कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. त्यातील खेडमधील एकाचा मृत्यू झाला. चारजण निगेटीव्ह झाले असून त्यातील एकाला घरी पाठवण्यात आले आहे. आता केवळ ६ महिन्याच्या बाळाचा अहवाल बाकी आहे.