corona in ratnagiri -पंतप्रधानांच्या आवाहनाला रत्नागिरीकरांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 04:36 PM2020-04-06T16:36:25+5:302020-04-06T16:37:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी वीज बंद करून घराबाहेर दिवे लावले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी वीज बंद करून दिवे लावले आणि आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले.

corona in ratnagiri - The humanity of the polis! Meals provided to families returning to the village | corona in ratnagiri -पंतप्रधानांच्या आवाहनाला रत्नागिरीकरांची साथ

corona in ratnagiri -पंतप्रधानांच्या आवाहनाला रत्नागिरीकरांची साथ

Next
ठळक मुद्दे कोरोनाच्या लढाईत साऱ्यांचा हातभार रत्नागिरीकर राहिले मोदींच्या पाठिशी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी वीज बंद करून घराबाहेर दिवे लावले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी वीज बंद करून दिवे लावले आणि आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले.

कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करून घराबाहेर एक दिवा लावण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत रत्नागिरीतील नागरिकांनी रविवारी रात्री ९ वाजता सर्व दिवे बंद केले. नागरिकांनी घराबाहेर दिवेही लावले होते. काहीजण बाल्कनीत आणि घराबाहेर येऊन फ्लॅश लाईट लावून उभे होते.

सोशल डिस्टन्सचे पालन करत कोणीही घराबाहेर पडले नव्हते. सर्वांनी घराबाहेरच दिवे लावले होते. काहींनी ह्यशुभं करोतीह्णदेखील म्हटली. काहींनी घराबाहेर येऊन पंतप्रधानांच्या नावाचा जयघोषही केला. यामुळे शहरातील इमारती, घरांमधील सर्व विजेचे दिवे बंद असल्याचे दिसून आले. काळोखातही मिणमिणते दिवे इमारतीच्या गॅलरीतून, बाल्कनीतून, खिडकीतून लुकलुकताना दिसत होते.

Web Title: corona in ratnagiri - The humanity of the polis! Meals provided to families returning to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.