corona in ratnagiri-रत्नागिरी जिल्ह्यात पुणे, मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचे सक्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 07:31 PM2020-03-26T19:31:26+5:302020-03-26T19:33:28+5:30
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई व पुणे शहरातून ८ मार्च २०२० नंतर आलेल्या व्यक्तींनी घरातच राहण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशीत केले आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मुंबई व पुणे शहरातून ८ मार्च २०२० नंतर आलेल्या व्यक्तींनी घरातच राहण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशीत केले आहे.
शासनाने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३,४ मधील तरतूदीनुसार अधिसूचना काढण्यात आली आहे. सद्यस्थितीत संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात बहुतांश भागात, रत्नागिरी जिल्ह्यासह कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव विषाणूबाधीत रुग्णांच्या संपर्कात आल्यास संसर्गाने होतो. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांपासून व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तींना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधील लोकांना एकत्रीत येण्यापासून प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
मुंबई व पुणे यासारख्या मोठ्या शहरात कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड-१९) संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई व पुणे शहरातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात रत्नागिरी जिल्ह्यातील नागरीक आल्यास त्यामुळे स्थानिक नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई व पुणे शहरातून ८ मार्च २०२० नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आले आहे.
आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ४३ व कलम ५६ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० खाली दंडनीय कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे.