कोरोना अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:22 AM2021-07-20T04:22:20+5:302021-07-20T04:22:20+5:30
२. दापोली तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे भातशेती करण्यास शेतकऱ्यांना ...
२. दापोली तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे भातशेती करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. सध्या शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे. मात्र, अशावेळेस गावात किंवा वाडीत एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव आणि वाडीची कोरोना तपासणी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. ना ताप, ना थंडी कोणतीही लक्षणे नसताना कोरोना चाचणी केली जात आहे.
३. संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. याचा ३१ एचआयव्ही बाधितांनी लाभ घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा एड्स नियंत्रण पथकाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील आणि ग्रामीण रुग्णालय, देवरुखचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी व लसीकरण विभाग यांच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले होते.